
प्रवीण तरडे यांना पहिला बिग बजेट सिनेमा देणारे आणि "हंबीरराव" यांची भूमिका तुम्हीच करू शकता हे सांगणारे संदीप मोहिते पाटील दादा, मराठी इंडस्ट्रीमधले पहिले बिग बजेट निर्माते यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... होय... पहिले बिग बजेट निर्माते, कारण १५ कोटी रुपये खर्च करून त्यांनी "सरसेनापती हंबीरराव" हा चित्रपट बनवला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक नवा दृष्टिकोन दिला.... मी नेहमी त्यांना म्हणतो, तुम्ही फक्त Producer नाही आहात तर Creative Producer आहात, म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि बजेट यांची उत्तम सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व.... पण माझ्या या मताला ते खो घालतात... संभाजी महाराजांवर पहिला बिग बजेट सिनेमा करणारेसुद्धा संदीप दादाच बरं का..... पहिल्यांदाच दिग्दर्शनात पाऊल ठेवणाऱ्या दिग्दर्शकाला संधी देणारे दादाच.... एका सिनेमाची गोष्ट छान हवी म्हणून वर्षभराहून अधिक काळ ४-५ लेखकांची टीम कामाला लावणारे दादाच... दिग्दर्शकाने जे मागावं ते देणारे दादाच.... धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमात सिद्दींच्या (शत्रूच्या) छावणीत नाचणाऱ्या महिला दाखवायच्या, तरी अंगप्रदर्शन नको आणि म्हणून कॉस्च्युम बदलासाठी स्वतःच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवणारे दादाच.... अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ३ दिवसांचे शूटिंग मनासारखे आणि चित्रपटाला न्याय देणारे झाले नाही, म्हणून पुन्हा लाखोंचा खर्च करून ते शूटिंग लावणारे निर्माते दादाच.... आपल्या चित्रपटाशी काहीही संबंध नसणाऱ्या चित्रपट तंत्रज्ञांच्या हॉस्पिटलचे बिल माफ करून मिळावे म्हणून झटणारे दादा... मराठी सिनेमा मोठा झाला पाहिजे म्हणून झटणारे दादा... चित्रपटात सिनेमॅटिक ॲक्शन सीन कसा असावा हे सुचविणारे निर्माते दादा... पटकथा कशी झाली आहे हे ऐकण्यासाठी over dinner ४०-५० लोकांना बोलवणारे दादा आणि कथा कशी वाटली, काय बदल करावा वाटतो का, हे त्या प्रत्येकाला विचारून त्याचे मत विचारात घेणारे निर्माते दादा..... आणि महत्त्वाचं म्हणजे निर्मात्यांनी स्वतःच संगीत रिलीज करून पैसे कमवावेत हा ट्रेंड आणणारे पण दादाच....अशा या हरहुन्नरी आणि मराठी चित्रपट निर्मितीवर अतोनात प्रेम करणाऱ्या संदीप दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... Happy Birthday Sir.... Sandeep Mohitepatil खूप काही बोलू शकतो, पण शब्द कमी पडतील...
This post was published on 05th June, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.4K followers on Instagram and has a total of 559 post.This post has received 9 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 4.27% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.