
The Trial season one आणि two दोन्ही छान आहेत, खिळवून ठेवतात. त्यात दोन मराठी कलाकारांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली आहे. खरंतर तीन महाराष्ट्रीयन यांनी — पहिल्या कलाकार Kajol , दुसऱ्या SonaliKulkarni आणि या सिरीजमधले माझे personal favourite Aseem Hattangady तिघेही सिरीजमध्ये मुख्य भूमिकांमध्ये आहेत. The Trial चा पहिला season पाहिला आणि मला सिरीज आवडली. नंतर असीम सरांकडून आधीच कळलं होतं की दुसरा season येणार आहे. उत्सुक होतो, पण मला बघायला उशीर झाला. पण जसा पहिला, तसाच पुन्हा या सिरीजच्या प्रेमात पडलो. सिरीजचं विशेष म्हणजे त्यात दाखवलेली नाती ही अतिशय सहज, खऱ्या आयुष्यातील वाटतात. मित्र असेच असतात, सहकारी असेच असतात. एक स्त्री — बायको, आई आणि दुसऱ्या season मध्ये बहीण, आणि professional आयुष्यातसुद्धा लढवय्या वकील अशा स्त्रीच्या सर्व बाजू यात सांगितल्या आहेत. कोणत्यातरी Hollywood series वरून बनवलेली ही सिरीज आहे... पण विषय मात्र भन्नाट आहे — खमकी बायको कशी असते? तर ती न्योनिका सेनगुप्ता असते! आणि ती भूमिका काजोल यांनी जबरदस्त साकारली आहे. असीम हट्टंगडी यांच्याबद्दल सांगायचं तर अभिनयाचं घरातून मिळालेलं बाळकडू त्यांच्या अभिनयात जाणवतं. मग हिंदी सिनेमातल्या वेगवेगळ्या भूमिका असोत किंवा Sccop, The Trial आणि Decoupled सारख्या webseries मधल्या त्यांच्या भूमिका असोत. सोनाली कुलकर्णी यांच्या बद्दल मी वेगळं काय लिहिणार? त्यांनी यात राजकारणी महिलेची भूमिका अशी निभावली आहे की आपल्याला राग येतोच. आणि The Trial मध्ये कदाचित पहिल्यांदाच काजोल यांना मराठीत संवाद सादर करत अभिनय करताना तुम्ही पाहाल. कमाल सिरीज आहे... नक्की बघा JioHotstar वर.
This post was published on 26th May, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.4K followers on Instagram and has a total of 559 post.This post has received 1 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 4.27% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.