
आज Riteish Deshmukh यांच्या राजा शिवाजी चा मराठी चित्रपट म्हणून खूप गौरव होतोय. नक्कीच प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण आज 14 मे, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ही पोस्ट शेअर करतोय. विकी कौशलl यांच्या छावा च्या अगोदर... धाकल्या धान्यांची गौरवगाथा सांगणारा एक मराठी चित्रपट, तोही मोठ्या स्केलवर बनवलेला भव्यदिव्य चित्रपट रिलीज झाला होता. आपलाच मराठी माणूस एका फिक्शनल गुंडाची पुष्पा ची गोष्ट बघायची म्हणून वाट पाहत राहिला आणि महाराजांचा सिनेमा पाहायला नाही गेला. हे मी मनाचं बोलत नाहीये, आकडेवारी आणि डेटा वरून बोलतोय.... आम्हाला बॉलिवूडचा मसाला आणि तेच स्टार्स हवे असतात... एवढा महागडा सिनेमा चांगला थिएट्रिकल कलेक्शन करू शकला नाही... आणि निर्माते Sandeep Mohitepatil , ज्यांनी स्वतः सेटवर उभं राहून जातीने लक्ष घालून सिनेमा बनवला आणि त्यांना तेवढीच पोटतिडकीने साथ दिली त्यांचे जिवाभावाचे सोबती या आणि निर्माते Saujanya Nikam Dharmendra Bora , Shekhar Mohite Patil आणि केतनराजे भोसले यांनी, Tushar Vijay Shelar यांचं दिग्दर्शक म्हणून पदार्पण आणि अनुपसिंह ठाकूर यांचं कन्विक्शन याने सिनेमा खूप छान बनला, पण प्रेक्षक म्हणून मराठी माणूस कमी पडला. कारण या सिनेमात खरा इतिहास दाखवला, उगाच काहीही नाही... आणि आम्हाला ते कसं आवडेल. या सिनेमातले महाराज मेहुण्यांवर ओरडले नाहीत, पण औरंगजेबाला लाथ घालताना मात्र नक्की दाखवलेत. इतकं लिहिण्याचं कारण म्हणजे या सिनेमावर झालेली मेहनत आणि खर्च मी डोळ्यांनी पाहिलाय. माझं नशीब म्हणून या प्रोजेक्टच्या स्क्रिप्ट बांधणीमध्ये मी एक छोटासा भाग होतो. अजूनही तुम्हाला वाटत असेल की हा सिनेमा पुन्हा रिलीज व्हावा, तर तुमचं गाव कमेंट करा...
This post was published on 14th May, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.4K followers on Instagram and has a total of 559 post.This post has received 4 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 4.27% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.