
@anushrisurekhamane आणि मी पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मी Planet Marathi वर एक YouTube interview शो क्रिएटिव्ह Producer म्हणून करत होतो. शो सुरू होण्यापूर्वी आम्ही सहज गप्पा मारत बसलो होतो… आणि त्या गप्पांमध्ये तिने तिच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी माझ्यासमोर उलगडल्या. लहान वयातच वडिलांचं छत्र हरपणं… आईने दुसऱ्यांच्या घरी धुणं-भांडी, शिवणकाम करून घर चालवणं… अनुश्रीने स्वतः सुद्धा शिवणकाम केलं आहे. अशा अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ती आज इथपर्यंत पोहोचली आहे. आपण प्रेक्षक म्हणून स्क्रीनवरून एखाद्याला judge करणं खूप सोपं असतं… पण त्या माणसामागे किती संघर्ष आहे, हे आपल्याला माहीत नसतं. खरं सांगायचं तर, यावर्षी @bbmarathi मी फक्त अनुश्री आणि @ruchujamdar यांच्यासाठी बघायला सुरुवात केली. सुरुवातीला Bigg Boss मध्ये अनुश्री काही ठिकाणी चुकीची दिसली, काही निर्णय चुकले… पण महत्त्वाचं म्हणजे — तिने स्वतःमध्ये बदल केले. आणि तो moment मला खूप लक्षात राहिला… जेव्हा संस्कृतीने तिचं पत्र फाडलं आणि अनुश्री म्हणाली “आता फॅमिली वीकपर्यंत टिकून दाखवणारच.” आणि तिने ते करून दाखवलं. काल तिची आई Bigg Boss मध्ये आली… आणि तो क्षण खरंच सगळं सांगून गेला. शेवटी अनुश्री बद्दल एवढंच म्हणेन — “ती आली… तिने पाहिलं… ती चुकली… ती सुधारली… आणि तिने करून दाखवलं.” बाकी पुढच्या प्रवासासाठी अनुश्रीला मनापासून शुभेच्छा 🙌 – Mayursinh
This post was published on 26th March, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.3K followers on Instagram and has a total of 552 post.This post has received 22 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 6.73% per post on Instagram. This post has received 1 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.