
Netflix वर “मटका किंग” – अपेक्षा, अनुभव आणि एक ठळक परफॉर्मन्स 🎬 नागराज मंजुळे यांचा झुंड पाहिल्यानंतर मनात एक विचार ठाम बसला होता — कथा आहे, विषय आहे… पण अजून थोडं धाडस झालं असतं तर काहीतरी वेगळं घडलं असतं. तोच विचार “मटका किंग” पाहताना पुन्हा एकदा जाणवला. सिरीज सुरू होताना कुतूहल निर्माण होतं, पण जसजशी कथा पुढे सरकते तसं ते कुतूहल टिकून राहत नाही. काही पात्रं येतात, जातात… पण त्यांचा नेमका उद्देश काय होता, ते कथेला कितपत पुढे नेतात, हे स्पष्टपणे समजत नाही. भारत जाधव यांचं पात्र का आहे, त्याचा परिणाम काय, हा प्रश्न राहतोच. गिरीश कुलकर्णींसारख्या दमदार अभिनेत्याची व्यक्तिरेखा सुद्धा कुठून सुरू होऊन कुठे पोहोचते, हे नीट पकडता येत नाही. संपूर्ण सिरीजमध्ये “मटका किंग” किती प्रामाणिक होता, यावरच मुख्य फोकस ठेवलेला दिसतो. पण एक प्रेक्षक म्हणून मनात प्रश्न निर्माण होतो — त्याचं खरं कर्तृत्व काय? फक्त एक नवीन सट्टा खेळ सुरू केला, एवढ्यावरच आपण थांबतो का? या पलीकडे काही मोठं, प्रभावी, लक्षात राहील असं काही का जाणवत नाही? इतक्या मोठ्या आणि रोचक विषयात जिथे सिस्टिमच्या चुका, त्या काळातील राजकीय किंवा अंडरवर्ल्डचे संदर्भ, आणि अनेक धाडसी घटना खोलात जाऊन दाखवता आल्या असत्या, तिथे सिरीज थोडी safe खेळते असं जाणवतं. अनेक महत्त्वाच्या गोष्टी फक्त संवादांमधून सांगितल्या जातात, पण त्या प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवायला मिळाल्या असत्या, तर परिणाम अधिक प्रभावी झाला असता. पण या सगळ्यात एक गोष्ट अशी आहे जी अक्षरशः मन जिंकून घेते — आणि ती म्हणजे सिद्धार्थ जाधव यांचा परफॉर्मन्स. खरं सांगायचं तर, सिरीजमध्ये ते जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसतात, तेव्हा ते प्रत्येक वेळी सीन स्वतःकडे खेचून घेतात. त्यांच्या अभिनयात एक वेगळीच धार आहे — body language इतकी natural आणि impactful, संवादांची delivery इतकी नेमकी, आणि भावनांचा तोल इतका अचूक की प्रेक्षक पूर्णपणे गुंतून जातो. त्यांनी त्या व्यक्तिरेखेचा जो “bearing” पकडलाय, तो खरोखरच कमाल आहे. आणि शेवटी त्यांनी दिलेला monologue… तो तर सिरीजचा आत्माच वाटतो. त्या काही मिनिटांमध्ये त्यांनी ज्या intensity ने अभिनय केला आहे, तो पाहून खरंच “wah wah” असंच म्हणावंसं वाटतं. त्या एका परफॉर्मन्ससाठी सुद्धा सिरीज बघावी असं नक्की वाटतं. एकंदरीत, mass point of view ने पाहिलं तर “मटका किंग” ही सिरीज एकदा पाहण्यासारखी आहे. पण ज्या विषयात अजून खोलात जाऊन, थोडं अधिक धाडस दाखवून, काहीतरी वेगळं आणि लक्षात राहणारं निर्माण होऊ शकत होतं, तिथे ती थोडी कमी पडल्याची भावना राहते.
This post was published on 21st April, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.3K followers on Instagram and has a total of 552 post.This post has received 2 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 6.73% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.