
मे महिना मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक नंबर ठरला. Riteish Deshmukh यांच्या ऐतिहासिक सिनेमा राजा शिवाजी ने बॉक्स ऑफिस फाडलं, आणि Pravin Vitthal Tarde यांचा देऊळ बंद २ सिनेमा आता बॉक्स ऑफिसच्या चिंध्या करत आहे. सोबत लोणच्यासारखा Working i films यांचा बाप्या प्रेक्षकांचं वेगळंच मनोरंजन करत आहे. खऱ्या अर्थाने मराठी इंडस्ट्रीने मे महिन्यावर राज्य केलं आहे. आता बारी आहे जूनची... घबाडकुंड! Sandeep Pathak , Devdatta G Nage, Kushal Badrike , Shashank Shende ... बा बा बा! काय सुपर कलाकारांची स्टारकास्ट आहे.फक्त सुपरस्टार न म्हणता सोबत कलाकार मुद्दाम म्हणतोय, कारण या सगळ्यांना जवळून ओळखतो. एक नंबरचे अभिनेते आहेत सगळे. आत्ताच ट्रेलर पाहिला आणि स्वतःला लिहिण्यापासून अडवू शकलो नाही. काय खतरनाक ट्रेलर आहे! म्हणजे हेच पाहिजे मराठी प्रेक्षकांना, असं एका मिनिटात वाटून गेलं. आणि खरंच, रितेश देशमुख, प्रवीण तरडे आणि आता प्रीतम एस. के. पाटील व त्यांचे निर्माते डॉ. रसिक कदम यांनी ते करून दाखवलं आहे. आता प्रेक्षकांनी घबाडकुंड ला प्रेम द्यावं, म्हणजे पुन्हा कुठलाच निर्माता मोठा विषय, मोठी कथा आणि मोठा सिनेमा बनवताना कमी पडणार नाही. १९ जूनला घबाडकुंड रिलीज होत आहे. तोपर्यंत देऊळ बंद २ आणि राजा शिवाजी आहेतच मनोरंजन करायला. नक्की बघा! ट्रेलरची लिंक : https://youtu.be/R6XfA0MOZbs?si=PiwKggb_q3-rjhcZ
This post was published on 01st June, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.4K followers on Instagram and has a total of 559 post.This post has received 31 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 4.27% per post on Instagram. This post has received 6 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.