
राजा शिवाजी – टीकेच्या पलीकडचं वास्तव आणि आपली जबाबदारी 🚩 एखादा नट एखाद्या भूमिकेत आवडणे-न आवडणे — हे पूर्णपणे वैयक्तिक मत असू शकतं. त्यात काहीच गैर नाही. पण त्या निमित्ताने संपूर्ण निर्मितीला “सुमार” म्हणणं, थेट शब्दांत हिणवणं — हे फक्त मतप्रदर्शन राहत नाही… ते पाय खेचण्याकडे झुकतं. आज एक गोष्ट स्पष्ट दिसते — मराठी माणूसच मराठी सिनेमाची लाज काढतोय. चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे. आपण teaser, काही visuals पाहिले… आणि लगेच निकाल लावला. उद्या दुसऱ्या भाषेचा (साऊथ/हिंदी) मोठा सिनेमा येईल, तेव्हा आपण इतक्याच कठोरपणे बोलू का? की तिथे “vision”, “scale”, “mass” म्हणत टाळ्या वाजवू? आपलीच म्हण आपण उलटी करून ठेवलीय "आपलं ते कार्ट आणि साऊथ वाल्यांच ते बाळ" प्रश्न सरळ आहे — दुहेरी निकष का? काही जण म्हणतात, “अमुक कलाकार हवा होता, तमुक हवा होता…” पण वास्तव वेगळं असतं. कोट्यवधींची गुंतवणूक, प्रचंड जोखीम, logistics, schedules, marketing — जोखीम निर्मात्याची, जबाबदारीही त्याचीच. शिवाय इतर कलाकारांचे नखरे सहन करा ते वेगळे मग casting चा निर्णयही निर्मात्याचाच. आपण प्रेक्षक म्हणून निवड करू शकतो — आवडलं तर पाहायचं, नाही आवडलं तर टाळायचं. पण आधीच निर्णय देऊन बदनामी करणं, हे योग्य नाही. मोठ्या पडद्या साठी बनलेल्या सिनेमाला मोबाईल स्क्रीन वर बघून जज करणे म्हणजे XL size चे कपडे सडपातळ व्यक्ती ला घालायला देऊन फिट नाही असे म्हणणे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट — आज एक मराठी सिनेमा pan-India स्तरावर उभा राहतोय. ही अभिमानाची गोष्ट असायला हवी. पण आपण त्यात काय चुकलंय हे शोधण्यात जास्त व्यस्त आहोत. याच ट्रोलिंगमुळे बाहेरच्या माध्यमांनीही या चर्चांना उचलून धरलं… आणि त्याचा परिणाम? आपल्याच चित्रपटाची बदनामी. हे कोणामुळे झालं — हे आपण स्वतःलाच विचारायला हवं. मतभेद असू शकतात — असायलाच हवेत. पण संयम, समतोल आणि जबाबदारी हीसुद्धा तितकीच महत्त्वाची. चित्रपट १ मे ला येतोय. तोपर्यंत किमान एक संधी देऊया. आणि मगच ठरवू — काय योग्य, काय अयोग्य. माझं वैयक्तिक मत? हा सिनेमा मोठा ठरण्याची क्षमता ठेवतो. मला खात्री आहे की मराठी सिनेमाचे सर्व रेकॉर्डस ते मोडीत काढेल. तेव्हा नावं ठेवणारे सगळे तोंडावर पडलेलं असतील. तोवर जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩 प्रतीक्षा – १ मे | #राजाशिवाजी Riteish Deshmukh #Mumbaifilmcompany
This post was published on 19th April, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.3K followers on Instagram and has a total of 552 post.This post has received 25 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 6.73% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #Mumbaifilmcompany has been used frequently in this Post.