
रुचिता जमादार @ruchujamdar Bigg Boss Marathi मधून बाहेर पडली, आणि तिच्याबद्दल खूप लोक खूप काही बोलताना दिसत आहेत. पण मला तिच्याबद्दल एक छोटा अनुभव सांगावासा वाटतो. काही वर्षांपूर्वी एका ॲड प्रोडक्शनसाठी आम्ही रुचिताला कास्ट केलं होतं. प्रोड्युसर म्हणून मी तिला सहज विचारलं, “येण्या-जाण्याची काय व्यवस्था करूया?” ती शांतपणे म्हणाली, “बाबा येतील मला घ्यायला आणि सोडायला.” शूटच्या दिवशी खरंच तिचे बाबा आले होते. शूट संपल्यानंतर आम्ही सगळे लंचला गेलो, पण तिचे बाबा आमच्यासोबत आत आले नाहीत. आम्ही खूप आग्रह केला, तरीही ते बाहेरच थांबले. ते रिक्षा घेऊन फक्त मुलीला सुरक्षित घरी सोडायला आले होते. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यातला स्वाभिमान पाहून मी खरंच थक्क झालो. आणि त्या शूटमध्ये रुचिताने जे परफॉर्म केलं होतं, ते पाहून तेव्हाच वाटलं होतं — “ही मुलगी खूप पुढे जाणार आहे.” आज तू शून्यातून इथपर्यंत पोहोचली आहेस, तेही एवढ्या लहान वयात. हे काही साधं नाही. Bigg Boss मधल्या काही गोष्टींमुळे तुला जे कोणी काही बोलत आहेत, त्यांना एकच सांगावंसं वाटतं — फिल्म सिटीच्या त्या सेटच्या बाहेर एक दिवस उभं राहून दाखवा… तेही सगळ्यांना जमणार नाही. रुचिता ते तू करून दाखवलं आहेस. म्हणून तिकडे लक्ष देऊ नकोस. राखी @rakhisawant2511 तुला “छोटी राखी सावंत” म्हणायची, तर तिच्याकडून एवढंच घे — "ट्रोल करणाऱ्यांना कसं पद्धतशीर ignore करायचं" बाकी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. – Mayursinh (Aka Creative Khopadi)
This post was published on 09th March, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.3K followers on Instagram and has a total of 552 post.This post has received 119 Likes which are greater than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 6.73% per post on Instagram. This post has received 5 comments which are than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.