
अभिमानास्पद क्षण! 🌟 News18 मराठी लोकमत व स्टार्ट अप महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशस्वी व्यक्तींच्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सपत्नीक उपस्थित राहण्याचा मान लाभला. आज नवी मुंबई येथे संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी पत्नी तस्मिया हिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ती करत असलेल्या सामाजिक व उद्योग क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.आमच्या कुटुंबासाठी खरोखर आज अभिमानास्पद दिवस आहे.शून्यातून विश्व निर्मिती करणाऱ्या माझ्या पत्नीची दखल आज इतक्या मोठ्या व्यासपीठावर घेतली जाते याचा खरोखर मनस्वी आनंद आहे.तिची बेरोजगार लोकांविषयी असलेली तळमळ तसेच आपल्या कार्यक्षम कार्यपद्धतीने आज सर्व महाराष्ट्रात तिने स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे याचा मला अभिमान आहे मला व माझ्या संपूर्ण परिवाराला तस्मिया तुझा अभिमान असून तुला पुढील कार्यास मनापासून हार्दिक शुभेच्छा. राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. तर न्यूज18 मराठीचे संपादक मंदार फणसे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी मंत्री उदय सामंत साहेबांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत, “कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असा विश्वास व्यक्त केला. सुंदर, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फराह खान यांनी केले. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. News18 Lokmat चे मनःपूर्वक आभार तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐 अब्दुल भैय्या शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासा विधानसभा मतदार संघ (अजित दादा पवार) #udaysawant #lokmat #news18marathi #abdulbhqiyyashaikh #tasmiyashaikh
This post was published on 09th May, 2026 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 19.6K followers on Instagram and has a total of 290 post.This post has received 792 Likes which are greater than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.39% per post on Instagram. This post has received 25 comments which are greater than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #udaysawant #tasmiyashaikh #abdulbhqiyyashaikh #news18marathi #lokmat has been used frequently in this Post.