
आज दिनांक 28 ऑक्टोबर २००२५ रोजी भव्य नोकरी महोत्सव आणि स्वयंरोजगार मेळावा पुष्पक मंगल कार्यालय, येथे संपन्न झाला. सदरील मेळाव्याचे उद्घाटन मित्राचे उपाध्यक्ष माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते झाले. पुष्पक मंगल कार्यालय, धाराशिव येथे भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवाचा शुभारंभ करून उपस्थितांशी संवाद साधला. या मेळाव्यास 2200 हून अधिक इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती. त्यापैकी 478 उमेदवारांना ऑफर लेटर मिळाले व 503 उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून अंतिम मुलाखतीसाठी कंपनीत बोलवले आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना येत्या वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळणार आहे. या महोत्सवात 52 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला व उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या महोत्सवाचे आयोजन बीजेपी चे युवा नेते मा. शंतनू पायाळ यांनी केले होते. सर्व कंपन्यांच्या मुलाखतीचे नियोजन व मुलाखतीचे प्रक्रिया ही जॉब फेयर इंडियाच्या संचालिका माननीय तस्मिया शेख यांनी केले. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. येत्या काळातही अशा प्रकारचे नोकरी व स्वयंरोजगार महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी माजी खा. श्री.सुधाकरराव शृंगारे, श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.नितीन काळे, श्री.शंतनू पायाळ, श्री.विकास बारकूल, श्री.खंडेराव चौरे, श्री.अमित शिंदे, श्री.सुनील काकडे, श्री.अभय इंगळे, श्री.राहुल काकडे, सौ.अस्मिताताई कांबळे, श्री.प्रीतीताई कदम, श्रीमती उषाताई येरकळ, कु.विद्या माने, श्री.नीलकंठ पाटील, श्री.संदीप इंगळे, श्री. सनी पवार, श्री. नितीन शेरखाने, श्री.सागर दंडनाईक, श्री.मदन बारकूल, श्री.कुणाल निंबाळकर, श्री.पुष्पकांत माळाले, श्री.गोपाळ कदम यांच्यासह तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, प्रा.चंद्रजीत जाधव यांच्यासह जिल्हाभरातून आलेले तरुण तरुणी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. #jobfairindia #jobfair #rojgarmela #rojgarmelava #ranajagdishsinghpatil #shantanupayal #tasmiyashaikh
This post was published on 09th November, 2025 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 18.6K followers on Instagram and has a total of 283 post.This post has received 209 Likes which are lower than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 2.48% per post on Instagram. This post has received 3 comments which are lower than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #rojgarmelava #shantanupayal #jobfair #tasmiyashaikh #ranajagdishsinghpatil #rojgarmela #jobfairindia has been used frequently in this Post.