
आयुष्यात प्रत्येक प्रश्नावर उत्तर आणि प्रत्येक संघर्षावर समाधान म्हणजे बायको. प्रत्येक वळणावर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणाऱ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात येण्याने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. आपल्या कामावर निष्ठा, कार्यक्षम महिला असण्याचे प्रत्येक गुण असणारी तु... घरातील प्रत्येकाचं मन जपणारी, तुझ्यातला प्रामाणिकपणा आणि स्वच्छ मन मला नेहमीच प्रभावित करत राहील. कार्यक्षम स्त्रियांचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा सुवर्ण अक्षरांनी तुझं नाव त्यात लिहिलं जाईल. बेरोजगार लोकांना रोजगार मिळून देण्यासाठी करत असलेली तुझी धडपड रोजगार स्वयंरोजगार वर तुझे कार्य हीच तुझी खरी ओळख. आयुष्यात अनेक संघर्ष आले, पण तू कधीही मला निराश होऊ दिलं नाहीस. तस्मिया, तुला वैवाहिक जीवनाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नशिबाने माझ्या लग्नाची तारीखही अजित दादांनीच काढली होती—तो दिवस आजही आठवतो. मुलासारखा जीव दादा मला लावायचे. लग्नाला आले होते तेव्हा जाताना त्यांनी जे शब्द बोलले, ते आजही मनावर कोरलेले आहेत— “तू नशीबवान आहेस. तुला तस्मियासारखी कर्तृत्ववान बायको मिळाली आहे. लग्नानंतरही तिचं बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम सुरू ठेव. कधीही तिचं काम थांबू देऊ नकोस. दोघंही सुखाने संसार करा.” हे शब्द आजही डोळ्यांत पाणी आणतात. आम्हा दोघांनाही अजित दादांसोबत काम करता आलं, हे आमचं भाग्य आहे. मी पक्षासाठी काम केलं, तर तिने त्यांच्या रोजगार प्रकल्पांवर काम केलं. माझ्या आयुष्यात तू आल्यापासून नेहमीच ऊर्जेने, सकारात्मकतेने जगायचे धडे मिळाले. तुझं कर्तृत्व मोजक्या शब्दांत मांडणं अशक्य आहे. आजपर्यंत जसं तू मला समजून घेत आलिस, तसंच पुढेही समजून घेशील, हीच अपेक्षा. लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 💐 अब्दुल शेख अजितदादांचा एकनिष्ठ कार्यकर्ता. #ajitpawar #AjitDadaPawar #tasmiyashaikh #abdulbhaiyyashaikh
This post was published on 09th February, 2026 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 20.2K followers on Instagram and has a total of 289 post.This post has received 1.3K Likes which are greater than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.16% per post on Instagram. This post has received 21 comments which are greater than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #AjitDadaPawar #ajitpawar #abdulbhaiyyashaikh #tasmiyashaikh has been used frequently in this Post.