
काल रंगभूमी दिवस होता त्यात माझं नशीब की तूझी साथ माहित नाही पण मी तुझ्याच सोबत होते. तू खूप काही दिलयस मला, खूप कशाला आज माझी ओळख तूझ्यामूळे आहे. माझ्यतल्या माणुसकीला जिंवत ठेवलयस तू, माझ्यातल्या मला मरू नाही देत तू. चौथ्या विंगेतून आत शिरताना येणारा धूर,माझ्यावर पडणारा प्रकाश ती वाजणारी थंडी,वाटणारी भिती,होणारी थरथर क्षणात नाहीशी होते,तूझी ऊब मिळते मला,तू सांगतेस मला “सगळीकडे खोटं वाग पण माझ्याशी तरी नको मग तूला कसं सांभाळायच ते मी बघेल” माझ्यासाठी रोजच रंगभूमी दिनासारखा आहे कारण त्यापलीकडे खरंच मला काही येतच नाही… माझा राग,द्वेष,प्रेम,माया,ईर्षा,लोभ,दुःख,सुख,कमीपण,मोठेपण सगळं सांभाळून घेतेस तू. खोट्यातल खरं आणि खऱ्यात खोट बरोबर कळत तुला. रंग अनेक चढवून सूद्धा कायम तूझ्या एका रंगात रंगवणं बरोबर जमतं तूला. तूझ्याशी खोटेपणा केला नाहिये मी कधी,अर्थात करणारही नाही. शेवटपर्यंत काहिच जमणार नाही मला हे नेहमीच माहित असतं पण तूझ्याकडे आल्यावर मला कस डगमगू द्यायचं नाही हे बरोबर जमतं तूला, “मी हे अनूभवलय” स्वतःसोबत प्रामाणिक राहायला शिकवलयस तू. या खऱ्या आयूष्यात खोटं आणि खोट्या आयुष्यात खरं कसं वागायचं हे तू शिकवलयस मला. तू जितकं दिलयस,आणि देतेयस त्याच या जन्मात तरी ऋूण फिटायच नाही. एक रंगकर्मी म्हणून आयुष्याची राखरांगोळी तूझ्या दारात काढावी लागली तरी कमीच. तूझ्या त्या रंगातली किमया ज्याला कळली त्याला कळली, तूझा लागलेला श्राप काय आहे हे ज्याला माहित त्याला नक्की कळेल मला काय म्हणायचय. असो तूर्तास इतकंच….. शेवटचा श्वास तूझ्याच उदरात घेतला का आयुष्याच्या नाटकाचा पडदा यशस्वीरित्या पडला असं समजेल मी. 🎭♥️ . #रंगभूमी
This post was published on 06th November, 2025 by Anushka on her Instagram handle "@anushkaborhade_ (Anushka Borhade 💎)". Anushka has total 608.6K followers on Instagram and has a total of 576 post.This post has received 1.3K Likes which are lower than the average likes that Anushka gets. Anushka receives an average engagement rate of 0.82% per post on Instagram. This post has received 64 comments which are lower than the average comments that Anushka gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.