
*सखाराम बाइंडर!❤️* पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेलं हे कथानक आजही आपल्या समोर उभा ठाकतं आणि नकळत अंगावर शहारे आणतं. ज्या समाजात, म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेत, ज्या विषयावर बोलणंसुद्धा अवघड वाटतं तिथं विजय तेंडुलकरांनी इतक्या ताकदीने, निर्भीडपणे आणि वास्तवदर्शी पद्धतीने हा विषय मांडला, हीच त्यांच्या लेखणीची कमाल आहे. नेहा जोशी, अनुष्का बोराडे, दाऊदच्या भूमिकेतले चरण जाधव आणि अर्थातच सयाजी शिंदे सर सर्वांचंच अप्रतिम सादरीकरण ! प्रत्येक संवाद, प्रत्येक नजर, प्रत्येक विराम सगळंच एवढं प्रभावी होतं की संपूर्ण रंगमंचावर एक वेगळी ऊर्जा पसरली होती. विषयाची मांडणी, त्यामागची अर्थपूर्णता आणि सखोल भावनिकता सगळंच थक्क करणारं.🙌🏻 #marathi #maharashtra #natak #reels
This post was published on 19th October, 2025 by Anushka on her Instagram handle "@anushkaborhade_ (Anushka Borhade 💎)". Anushka has total 608.6K followers on Instagram and has a total of 576 post.This post has received 481 Likes which are lower than the average likes that Anushka gets. Anushka receives an average engagement rate of 0.82% per post on Instagram. This post has received 1 comments which are lower than the average comments that Anushka gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #natak #reels #maharashtra #marathi has been used frequently in this Post.