
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, माझे अत्यंत लाडके, आदरणीय आणि प्रेरणास्थान असलेले नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. हा धक्का इतका मोठा आहे की शब्द अपुरे पडावेत, अशा अवस्थेत संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही, तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे ज्यांनी आम्हाला शिकवले, ते नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले. असंख्य तरुणांना राजकारण समजून घेण्याची, त्यात रस निर्माण होण्याची प्रेरणा देणारे ते दीपस्तंभ होते. त्यांच्या तोडीचे नेतृत्व पुन्हा होणे अशक्यच आहे, आणि त्यांच्या जागी कोणीही येऊ शकणार नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगती पोहोचावी यासाठी त्यांच्या मनात असलेली तळमळ, जिद्द आणि आपुलकी आपण सर्वांनी अनुभवली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी ज्या वेगाने, निर्धाराने आणि अपार समर्पणाने काम केले, तसा वेग आणि ती ऊर्जा दुर्मिळ होती. ते केवळ नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या स्वप्नांना चालना देणारे एक जिवंत वादळ होते. अशा ऊर्जावान, कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे अचानक जाणे हे महाराष्ट्रासाठी कधीही न भरून न येणारे, अपरिमित नुकसान आहे. त्यांच्या आठवणी, कार्य आणि विचार सदैव आमच्या मनात जिवंत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असलेले दादा, तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहाल.
This post was published on 28th January, 2026 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 20.2K followers on Instagram and has a total of 289 post.This post has received 285 Likes which are lower than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.16% per post on Instagram. This post has received 4 comments which are lower than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.