
मंदार वृक्षाच्या मुळात दिसलेले स्वयंभू गणपती वृक्षाच्या नावावरून असलेल्या गणरायाचे नाव ‘मंदार’ आहे. हा गणपती कसबापेठेत ढेरे वाड्यात पाहायला मिळतो. मंदार वृक्षाच्या मुळात ही स्वयंभू मूर्ती समोर आली आणि तिची प्रतिष्ठापणा केली, म्हणून त्या गणरायाला ‘मंदार गणपती’ असे नाव पडले आहे. पुराणात आख्यायिका सांगितली जाते. औरव नावाचा तपस्वी ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमेधा, तर मुलीचे नाव शमिका होते. शमिकाचे मंदार नावाच्या धौम्यपुत्राशी लग्न झाले. मंदार-शमिका यांच्याकडे भृशुंडी ऋषी आश्रयास आले होते. गणेशाच्या कठोर तपश्चर्यामुळे मृशुंडी ऋषींना गणपतीसारखी सोंड फुटली होती. ते पाहून मंदार, शमिका हसले. तेव्हा भृशुंडी ऋषींनी त्या दोघांना तुम्ही वृक्ष व्हाल, असा शाप दिला. तेव्हापासून मंदार व शमी हे दोघे वृक्षात रूपांतरित झाले. असे झाल्याचे समजताच शमिकाचे वडील औरव व मंदारचे गुरू शौनक यांनी त्या दोघांसाठी बारा वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा श्री गणेश प्रसन्न होऊन म्हणाले, “मी मंदार वृक्षाखाली राहीन आणि शमीच्या पूजनाने संतुष्ट होईन, परंतु भृशुंडी क्रींचा शाप खोटा होणार नाही. अशा या मंदार वृक्षातून २१ वर्षांनी गणेशाची स्वयंभू मूर्ती बाहेर पडते. अशा मूर्ती दुर्मीळ असून, त्यांच्या दर्शनास पुण्य असते व मनोकामना पूर्ण होण्यास गती मिळते, असे म्हणतात. कसबा पेठेत त्रिगुणेश्वर नावाच्या इमारतीत शंभर वर्षे जुना मंदार गणपती आहे. १९१७ साली इस्लामपूरकर नावाच्या कीर्तनकारांना कीर्तन करताना दृष्टांत झाला की, कसबा गणपतीजवळ वाड्यात मी मंदार वृक्षाखाली आहे. इस्लामपूरकर शोधत आले. वाड्यात आल्याक्षणी मंदार वृक्ष कोसळून पडला व त्यातून स्वयंभू गणपती बाहेर आलेला दिसला. त्यानंतर, मूर्ती स्थापन करून येथे छोटे मंदिर बांधण्यात आले. #ganpati #puneganpati #चतुर्थी #punecity #pune (ganpati ganpati bappa morya chaturthi )
This post was published on 05th April, 2026 by Shivam on his Instagram handle "@puneshorofficial (PuneShor | Pune City Guide)". Shivam has total 135.9K followers on Instagram and has a total of 2.3K post.This post has received 602 Likes which are greater than the average likes that Shivam gets. Shivam receives an average engagement rate of 0.34% per post on Instagram. This post has received 14 comments which are greater than the average comments that Shivam gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #puneganpati #punecity #pune #ganpati has been used frequently in this Post.