
किल्ले भरतगड,मसूरे गाव,सिंधुदुर्ग जिल्हा 📍 छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली होती. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांना मिळाला. तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.भरतगड किल्ल्याचे बांधकाम सावंतवाडी कर फोंड सावंत यांनी इ.स. १६८० मध्ये केली.वाडीकर फोंड सावंत यांनी किल्ल्यावर पाणी लागल्यानंतर किल्ल्याची बांधणी केली.पुढे तुळाजी आंग्रे यांनी भरतगड किल्ला जिंकला.पुढे इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात किल्ला गेला.भरतगडाचे दार भग्नावस्थेत आहे. तटबंदीची सुद्धा खूप प्रमाणात पडझड झालेली आहे. गडावर घनदाट वनराई आहे. गडावर मुख्यत: काजू व आंब्याच्या बागा आढळतात.भरतगडावर २०० फूट खोल विहीर आहे.विहीरीच्या तळाशी असलेल्या गुप्त दरवाजातून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते. भरतगडाचे वैशिट्य म्हणजे गडावर मंदीर आणि मशीद शेजारी आहे.गड पाहावयास एक तास पुरेसा आहे.
This post was published on 23rd August, 2025 by Ashish on his Instagram handle "@maharashtra_ig (Maharashtra Instagrammers)". Ashish has total 125.8K followers on Instagram and has a total of 9.2K post.This post has received 204 Likes which are lower than the average likes that Ashish gets. Ashish receives an average engagement rate of 0.92% per post on Instagram. This post has received 3 comments which are lower than the average comments that Ashish gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.