
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, सिकंदराबाद यांच्या उपस्थितीत झालेल्या नांदेड रेल्वे विभागाच्या विस्तृत आढावा बैठकीत राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी प्रशासनाला विविध प्रलंबित प्रश्नांवर धारेवर धरत नांदेडला दक्षिण मध्य भारताचे प्रमुख धार्मिक व पर्यटन प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्याची जोरदार मागणी केली. तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे देश-विदेशातून लाखो भाविक येत असल्याने नांदेड रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जानुसार विकास, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. बैठकीत रेल्वे पायाभूत सुविधा, नवीन रेल्वे सेवा, स्थानक विकास, सुरक्षा, स्वच्छता, डिजिटायझेशन, देखभाल आणि प्रवासी सुविधांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नांदेड स्थानकाच्या विकासाची सद्यस्थिती, डीपीआर, २०२५-२६ व २०२६-२७ मधील निधी, २०४७ पर्यंतचा मास्टर प्लॅन, दोन नवीन प्लॅटफॉर्म, पिट लाईन स्थलांतर, पर्यटन माहिती केंद्र, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सचखंड गुरुद्वाराचे जनसंपर्क कार्यालय, एक्झिक्युटिव्ह लाऊंज, कॅप्सूल हॉटेल, स्मार्ट पार्किंग आणि ईव्ही चार्जिंगसारख्या सुविधांबाबत माहिती मागविण्यात आली. डॉ. गोपछडे यांनी नांदेड स्थानकाचा देशातील स्वच्छ स्थानकांच्या पहिल्या दहामध्ये समावेश करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली. बॅटरी कार, व्हीलचेअर, क्यूआर आधारित तक्रार निवारण प्रणाली, जीपीएस डिस्प्ले, वाय-फाय, डिजिलॉकर सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ, धार्मिक गाड्यांमध्ये प्रत्येक चार तासांनी स्वच्छता, आरओ पिण्याचे पाणी, गुणवत्ता नियंत्रण कक्ष, आरपीएफची विशेष पथके, महिला सुरक्षा पथक, सीसीटीव्ही, फेस रिकग्निशन, इंटिग्रेटेड कमांड सेंटर आणि तंबाखूमुक्त रेल्वे अभियान प्रभावीपणे राबविण्याची मागणी त्यांनी केली. . #yuvarajyanews24live #nanded #nandedrailway #indianrailway #railways
This post was published on 07th July, 2026 by Avinash on his Instagram handle "@info_maharashtra1 (Info Maharashtra)". Avinash has total 59.6K followers on Instagram and has a total of 113 post.This post has received 190 Likes which are lower than the average likes that Avinash gets. Avinash receives an average engagement rate of 2.06% per post on Instagram. This post has received 2 comments which are lower than the average comments that Avinash gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #indianrailway #railways #nandedrailway #nanded #yuvarajyanews24live has been used frequently in this Post.