
तिच्या डोळ्यांत स्वप्न होतं, माझ्या डोळ्यांत फक्त संघर्ष… ती विचारायची “आपलं भविष्य काय?” आणि माझ्याकडे उत्तर असायचं फक्त शांत नजर… हातात तिचा हात हवा होता, पण हातात नोकरी नव्हती… मनाने श्रीमंत होतो मी, पण खिशात एक रुपयाही नव्हता कधी… ती म्हणायची, “तू खूप चांगला आहेस…” पण जगाला ‘चांगुलपणा’ नाही, तर ‘स्थैर्य’ लागतं…आणि मी तिच्या शब्दात हरवून गेलो होतो… तिच्यासाठी चांदणं आणायचं होतं, पण दिव्याचं बिल भरायलाही झगडत होतो… तिला सुख द्यायचं होतं, पण स्वतःचं दुःखही लपवत होतो… एक दिवस ती निघून गेली… कारण प्रेमापेक्षा वास्तव मोठं होतं… मी तिला थांबवलं नाही, कारण तिचं हसू माझ्या प्रेमापेक्षा महत्त्वाचं होतं… आजही आठवते ती… पण आता मी बदललोय… स्वप्नं अजूनही आहेत, फक्त आता त्यांना पूर्ण करण्याची जिद्द वाढलीय…
This post was published on 26th April, 2026 by Rajat on his Instagram handle "@ayushyacha_pravas (आयुष्याचा प्रवास ™)". Rajat has total 178.3K followers on Instagram and has a total of 6.5K post.This post has received 906 Likes which are lower than the average likes that Rajat gets. Rajat receives an average engagement rate of 0.99% per post on Instagram. This post has received 4 comments which are lower than the average comments that Rajat gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.