
🚩 #शिवप्रताप_दिन_विशेष #स्मृतिदिनविशेष १२ जुलै १६६० ची रात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन पालख्या तयार ठेवण्यास संगितल्या. रात्री १० वाजता किल्ल्यातून दोन पालख्या खाली उतरू लागल्या. शिवरायांनी पन्हाळगड सोडला. त्यांनी विशाळगडाचा रस्ता धरला, मार्गात राजांची माणसे अगोदर ठरल्यानुसार त्यांना येवून मिळत होती, वेढ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ४ ते ५ मैल दूर पोहचले. विशाळगडावर पोहचण्यासाठी १९ ते २० मैल अंतर अद्याप बाकी होते, याठिकाणी शिवरायांसोबत १००० मावळे होते, त्यातच शिवाजी काशिद होते. यावेळी त्यांच्या अंगावर महाराजांसारखा पेहराव होता, जणू प्रतिशिवराय राजेच. शिवा काशिद यांना पालखीत बसविण्यात आले. पालखीसोबत १० ते १२ हत्यारबंद मावळे होते. राजांचा निरोप घेऊन शिवाजी काशिद यांची पालखी लगबगीने मलकापूरच्या दिशेने गेली व शिवरायांची पालखी विशाळगडाच्या दिशेने रस्त्याने निघाली ते पन्हाळगडापासून आणखी दूर जात असताना जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले, काही वेळातच सगळा तळ जागा झाला जौहर रागाने लालेलाल झाला होता, शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली, प्रतिरुपाला शत्रुने ओळखले. सिद्धी जौहरने घोडदळाच्या तुकड्या छत्रपती शिवरायांना शोधण्यासाठी पाठविल्या. एका तुकडीला मलकापूरच्या रस्त्यात शिवरायांची पालखी दिसली, या पालखीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज (प्रति शिवाजी राजे:शिवाजी काशिद) दिसले, या जौहरच्या हत्यारबंद सैनिकांनि शिवाजी काशिद यांना पकडले. त्यांची पालखी सिद्धी जौहरच्या तंबूकडे नेली. राजे आल्याची बातमी जौहरला समजताच तो राजांच्या स्वागताला आला, त्याने छत्रपतींच्या पेहराव्यातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांची भेट घेतली. महाराज तहासाठी गडाखाली तंबूत आलेले आहेत ही बातमी वार्यासारखी पसरली व पालखीत बसलेल्या शिवाजी महाराजांना ( शिवा काशिद)जौहरच्या समोर नेण्यात आले. इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत शिवाजी राजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता. कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवरायांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते, म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी है ? यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही. त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली आणि तिथेच शिवा काशीद यांना वीरमरण आले
This post was published on 12th July, 2025 by Ajinkay on his Instagram handle "@ajinkya_nanaware (𝙰𝙹𝙸𝙽𝙺𝚈𝙰 𝚂𝙰𝙽𝙹𝙰𝚈 𝙽𝙰𝙽𝙰𝚆𝙰𝚁𝙴)". Ajinkay has total 45.7K followers on Instagram and has a total of 899 post.This post has received 1.3K Likes which are lower than the average likes that Ajinkay gets. Ajinkay receives an average engagement rate of 13.59% per post on Instagram. This post has received 17 comments which are lower than the average comments that Ajinkay gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.