
लोकांच्या जीवाची किंमत अवघे वीस रुपये? नगर–मनमाड हायवेवर खड्ड्यांनी उघडलेले मृत्यूचे दरवाजे… फक्त एका आठवड्यात ६ निरपराध नागरिकांचे प्राण गेले. आम्ही मोठ्या आंदोलनातून आवाज उठवला, तेव्हा प्रशासनाने “अवजड वाहनांचे डायव्हर्जन करू” अशी ग्वाही दिली. पण नेहमीप्रमाणे आश्वासन फोल ठरले! आज पुन्हा अवजड वाहने रस्त्यावरून धावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फक्त ५०० रुपयांची किंवा २० रुपयांची लाच घेऊन ही जीवघेणी वाहने हायवेवर सोडली जात आहेत. हे खुद्द ट्रक ड्रायव्हरनेच कबूल केले आहे. अहो, एवढी नीच पातळी? लोकांच्या जीवाचं मोल इतकं स्वस्त? लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अजून किती बळी घेणार? लोकांच्या जीवांची जबाबदारी कोण घेणार? यापुढे जर एखाद्या नागरिकाचा जीव गेला, तर त्याला पूर्णपणे पोलिस प्रशासन जबाबदार असेल. आम्ही एसपींना इशारा दिला आहे, तात्काळ अवजड वाहनं बंद करा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाची परिसीमा दाखवू! #नगर_मनमाड_हायवे #अपघातसत्र #भ्रष्टाचार @gadkari.nitin
This post was published on 18th September, 2025 by Rahuri on his Instagram handle "@rahurisocial (आपला राहुरी तालुका 📍)". Rahuri has total 23.2K followers on Instagram and has a total of 94 post.This post has received 2.2K Likes which are greater than the average likes that Rahuri gets. Rahuri receives an average engagement rate of 5.69% per post on Instagram. This post has received 27 comments which are lower than the average comments that Rahuri gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.